भाज्या सामान्यांना ‘भाव’ देईनात

एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या भावाने उच्चांक गाठला असताना, मागच्या काही दिवसांपासून भाज्यांचे भाव ऐकून सामान्यांचं तोंड शिळं झालं आहे. ऐन सणावाराला गृहिणींचं बजेट कोलमडून पडलं आहे. जनसामान्यांना भाज्यांच्या दरवाढीची मोठी झळ पोहोचली आहे. भाज्यांसोबतच घरगुती गॅस सिलेंडरचे भावही वाढले असल्याने आता गाडीतल्या इंधनाबरोबर, पोटातलं इंधनही महाग झालं आहे. त्यामुळे खायचं काय आणि वाढायचं काय, असा प्रश्न सर्वसामांन्यांना पडला आहे. अवकाळी पाऊस, हवामान बदल यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचा दर २०-३० टक्क्यांनी वधारला आहे. भाज्यांच्या या वाढत्या ताज्या दरांमुळे अनेक ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here