कुणी लोकल सुरू करता का? लोकल…

166

ब्रेक दि चेनमुळे राज्यात कडक निर्बंध घातले गेले असल्याने सर्वसामान्यांची आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. सामांन्यांचं जे रहाटगाडगं सुरू होतं त्याला या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला आहे. गेलं संपूर्ण वर्ष कसं बसं स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सामांन्यांनी पोटाला चिमटा काढून घरात बसून घालवलं. अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. अनेकांचे व्यवसाय बुडाले. पण तरीही संकटावर मात करण्याचं सामांन्यांचं असामान्य कर्तृत्त्व यावेळी दिसून आलं. हेही दिवस जातील, असं म्हणत आपण सगळेच या आव्हानाला सामोरे जात आहोत. पण घरात तरी किती दिवस बसायचं? जीव वाचवण्यासाठी जीव जगवायला तर हवा. आता लॉकडाऊनमध्ये लोकल बंद, सामांन्यांना परवडणारी एसटी सुद्धा राज्य सरकारने मुंबईच्या प्रवासासाठी बंद केली. मग रोजीरोटी कशी कमवायची? घर चालवण्यासाठी घराबाहेर तर पडावंच लागेल, सगळ्यांनाच नाही करता येत वर्क फ्रॉम होम! मग नाईलाजाने सामांन्यांना पोटासाठी खोटं काम करावं लागतं. आणि हे करत असताना जर त्यात तो पकडला गेला तर ती चूक नाही, तो असतो गुन्हा.

या तरुणाने मांडलेल्या भआवना या तुमच्या आमच्या मनातही आहेत. लबाडी करुन करोडोंची वसुली करणारे बाहेर ताठ मानेने फिरत आहेत. पण पोटाची खळगी भरण्यासाठी मनाविरुद्ध गैर काम करणा-यांवर कारवाई होत आहे… मग नक्की गुन्हागार कोण? हा प्रश्न पोटाला कळत नाही, पोटाला फक्त भूक कळते. या तरुणाप्रमाणेच तुमच्याही मनातल्या भावना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी हिंदुस्थान पोस्टला नक्की सबस्क्राईब करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.