काळ्या मिरीचे औषधीय गुण कडव्या चवीची काळी मिरी ही आपल्याला बऱ्याच तऱ्हेने उपयोगी असते. काही आजारांवर काळी मिरी हा अप्रतिम उपायही आहे. तुम्हाला कदाचित याबाबत काही माहीत नसल्यास, आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत. पाहूया काय आहेत काळी मिरीचे फायदे.
कॅन्सरपासून संरक्षण काळ्या मिरीमध्ये अँटीऑक्सीडंट असतात, जे ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देण्यास मदत करतात. काळ्या मिरीमध्ये असणारे पिपेरिन हे कॅन्सरशी लढा देण्यामध्ये अग्रेसर असतं. प्रोटेस्ट कॅन्सरमध्ये वापरण्यात येणाऱ्या किमोथेरपीमध्येदेखील पिपेरिन वापरण्यात येतं. त्यामुळे काळी मिरी कॅन्सरपासून तुमचं संरक्षण करण्यात महत्त्वाचा वाटा उचलते.
जखम भरली जाते तुम्हाला कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल किंवा रक्त थांबत नसेल तर काळी मिरी कुटून त्यावर लावावी. काळी मिरी अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि दुःखनिवारक असते, यामुळे तुमची जखम लवकर भरते.
कोंड्याची समस्या दूर होते तुमच्या केसांमध्ये कोंड्याची समस्या झाली असेल तर तुम्ही दह्यामध्ये 1 चमचा वाटलेली काळी मिरी त्यामध्ये मिसळा आणि ती तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर केस थंड पाण्याने धुवा. दुसऱ्या दिवशी केस शँपूने धुवा.
वजन कमी होते काळ्या मिरीच्या बाह्य भागामध्ये फाईटोन्यूट्रिअंट्स असतात. ज्यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते. तुमची साठलेली चरबी याच्यामुळे कमी होऊ शकते. हे तुमच्या शरीरातील टॉक्झिक तत्व आणि पाणी काढण्यासाठी फायदेखील ठरतं. त्यामुळे तुमचं वजन अगदी लवकर कमी होतं.