भरपूर पाणी प्या शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाण्याचे योग्य सेवन आवश्यक आहे. ७ ते ८ ग्लास पाणी जरूर प्या.
पोषक समृद्ध आहार पोटासंबंधी समस्या कमी करण्यासाठी आपल्या आहारात शक्य तितके प्रोटीन, फायबर, संपूर्ण धान्य, ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
फायबर फायबरमुळे मलविसर्जन सुलभ होते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. फायबर खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
हिरव्या पालेभाज्या निरोगी यकृताला चालना देण्यासाठी, आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या जसे की ब्रोकोली, पालक, मेथी, फुलकोबी यांचा समावेश करावा.
३० मिनिटे व्यायामतंदुरुस्त आणि सक्रिय रहाण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. यात तुम्ही चालणे, वर्कआऊट करणे, योग किंवा नृत्याचादेखील समावेश करू शकता.
दीर्घ श्वास घेणे मानसिक शांती आणि तणाव कमी करण्यासाठी, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम करून वृद्धत्वाची लक्षणे कमी करू शकता.
शांत झोपतंदुरुस्त मन आणि शरीरासाठी नियमितपणे ८ तासांची पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.
त्वचेची काळजी घेणेनिरोगी जीवनशैलीमध्ये शरीराची स्वच्छता आणि त्वचेची काळजी, अश्या २ गोष्टींचा समावेश असतो. फेस पॅक आणि हेअर पॅक लावून वेळोवेळी त्वचेची निघा राखणे गरजेचे आहेत.