डोळ्यांचा संसर्ग उन्हाळ्यात येणारी उष्णतेची लाट शरीरासह डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगली नसते. यामुळे डोळ्यांचा संसर्ग वाढू शकतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळेही डोळ्यांसंबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे तुम्हा उन्हात बाहेर जात असाल तर सनग्लास लावावे आणि डोळे थंड पाण्याने धुवावे.
टायफाइड उन्हाळ्यात टायफायड आजाराला लोक बळी पडू शकतात. मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. या आजारात ताप, डोकेदुखी, उलट्या,जुलाब आणि थकवा यासारख्या समस्या जाणवतात. यामुळे उन्हाळ्यात आहाराची काळजी घ्यावी. आहारात हंगामी फळ आणि भाज्यांचा समावेश करावा. उन्हाळ्यात शिळे पदार्थ खाणे टाळावे.
अन्न विषबाधा आरोग्य तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात पोट बिघडणे, उलट्या आणि जुलाब यासारखे आजार उद्भवू शकता. कारण अन्नातून विषबाधा होते. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते आणि त्यात बॅक्टेरिया वाढतात. यामुळे असे पदार्थ खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते. त्यामुळे जास्त वेळ ठेवलेले अन्न खाऊ नका, रस्त्यावरील खाद्यपदार्थही टाळा.
पोटासंबंधित आजार उन्हाळ्यात पोटासंबंधित आजार वाढू शकतात. कारण या दिवसांमध्ये अन्न आणि पाण्यातून बॅक्टेरिया पोटात जाऊ शकतात. यामुळे बद्धकोष्ठता, जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे स्वच्छ पाणी आणि खाद्यपदार्थ खावे.