तरुण दिसण्यासाठी घरबसल्या करा 'हे' सोपी योगासने

तरुण दिसणं कुणाला आवडत नाही? प्रत्येकजण यासाठी प्रयत्न करत असतो.

पण तुम्हाला माहिती आहे का? एकदम सोपी योगासने करून तुम्ही अधिक तरुण दिसू शकता. 

सूर्यनमस्कार पूर्ण शरीरासाठीचा व्यायाम आहे. रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला चमकदार बनवते.

वज्रासन यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकून त्वचेला चमक मिळवून देते.

शवासन ताणतणाव कमी करून शरीराला आराम देते. शांत झोप लागण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा तजेलदार दिसते

त्रिकोणासन पोटाचे स्नायूना तसेच शरीराला अधिक लवचिक बनवतो आणि तजेलपणा देतो.

प्राणायाम (श्वसनाचे व्यायाम) कपालभाती, अनुलोम-विलोम यांसारखे प्राणायाम त्वचेच्या ताजेतवानीसाठी उपयोगी आहे.

सूचना  ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.