लोकसभा निवडणूक २०२४ : वाचा रोचक माहिती

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १३ केंद्रीय मंत्री पराभूत

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ७ अपक्ष उमेदवार विजयी

शिवसेनेचे उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर यांनी उत्तर-पश्चिम मुंबईमध्ये त्यांच्या उबाठा प्रतिस्पर्ध्याला 48 मतांनी पराभूत करत सर्वांत कमी मताधिक्याने विजय मिळवला. 

दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या जागा जिंकल्या आहेत. पंजाबमध्ये खदूर साहिबमधून अमृतपाल सिंग विजयी झाले. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामध्ये शेख अब्दुल ‘इंजिनियर’ रशीद यांनीही आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

भाजपचे लल्लू सिंह फैजाबाद (अयोध्या) लोकसभा मतदारसंघात सपाच्या अवधेश प्रसाद यांच्याकडून ५०,००० मतांनी पराभूत झाले.

२०२४ च्या निवडणुकीत १.०५ दशलक्ष मतदान केंद्रांवर १.८ दशलक्ष EVM प्रणाली आणि १.७ दशलक्ष नियंत्रण युनिट्स तैनात करण्यात आल्या होत्या.

म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड या कंपनीने भारताच्या निवडणूक आयोगाला अमिट शाईच्या २६ लाखांहून अधिक बॉटल्स पुरवल्या.

नवी दिल्लीत सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकूनही आम आदमी पक्षाला राजधानीत लोकसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही.

मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोराम आणि जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.

१९८४मध्ये राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने ४१४ जागा जिंकल्या. त्या वेळी पहिल्यांदा भारतात एखाद्या पक्षाने ४०० पार केले होते. त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्यावर लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते की, "ये लोकसभा का नाही, शोकसभा का चुनव है".