अत्यंत दुर्मिळ आणि वेगळ्या श्री गणेशमूर्ती !

कांगितेन (शोतेन)  जपानमधील  कांगितेन येथे गणेश आणि गणेशी एकमेकांना आलिंगन देतांना पाहायला मिळतात.

छायाचित्र : मकरंद करंदीकर

रिद्धी विनायक व सिद्धी विनायक या मूर्तीमध्ये गणेशाचा एक देह, चार हात आणि उजवीकडे आणि डावीकडे सोंड असलेली दोन मस्तके आहेत.

छायाचित्र : मकरंद करंदीकर

एकाच मूर्तीत रिद्धी व सिद्धी विनायक यात मूर्तीच्या एका बाजूला उजव्या सोंडेचा तर दुसऱ्या बाजूला डाव्या सोंडेचा गणपती आपल्याला दर्शन देतो. हे दोन्ही गणपती पाठीला पाठ लावून बसलेले आहेत.

छायाचित्र : मकरंद करंदीकर

मानवी कवट्यांवर विराजमान, कापालिक गणेश यातील गणेशाची मूर्ती ही चार हातांमध्ये अनुक्रमे तुटलेला अर्धा दात, शंख, पोथी आणि मोदक असून, बाप्पा मानवी कवट्यांवर विराजमान झाले आहेत. 

छायाचित्र : मकरंद करंदीकर

 रिद्धी व सिद्धी विनायकाच्या सोंडेत दिवा दोन्ही मुखांच्या सोंडांमध्ये एक कोरीव कलात्मक दिवा असून, दिव्याखाली एक छोटीसी  घंटा आहे.

छायाचित्र : मकरंद करंदीकर

दशभुजा लक्ष्मी गणेश वीर योध्दे, सेनापती आणि दशभुजा शस्त्रधारी बाप्पाची आरास असलेल्या बाप्पाला दशभुजा  लक्ष्मी गणेश असे बोलले जाते.

छायाचित्र : मकरंद करंदीकर