आवडत्या व्यक्तीला संपर्क करा
तुम्हाला दिवसभर अनुत्साह आणि नैराश्य जाणवत असेल, तर वेळ काढून एका आवडत्या व्यक्तीला फोन करा. त्याच्याशी संवाद साधा. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.
गरम शॉवर घ्या
गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंमधील कडकपणा आणि रक्तदाब कमी होतो. यामुळे उत्साह वाढतो.
ध्यान किंवा योग करा
योग किंवा ध्यानामुळे अनावश्यक विचार दूर व्हायला मदत होते. यामुळे एकाग्रता वाढणे, योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
गाढ झोप घ्याझोप हा आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यामुळे आरोग्य सुधारतेच शिवाय स्वभावातही सकारात्मक बदल होतो. गाढ झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळते आणि शरीराचे कार्य सुधारून मनाचा उत्साह वाढायला मदत होते.
गाणी ऐकाहल्ली बाजारात संगीतोपचारविषयक थेरपी उपलब्ध आहेत. संगीत ऐकल्याने मनावर सकारात्मक परिणाम होऊन उत्साह वाढतो. मनातील मरगळ, निरुत्साह दूर होऊन ताजेतवाने वाटू शकते.
फिरायला जा
जेव्हा आपण नैराश्यामध्ये असतो, तेव्हा आपले स्नायू घट्ट होतात. अशा वेळी घराबाहेर फिरायला जा. यामुळे स्नायूंमधील ताण कमी होतो आणि नैराश्य दूर होते.