महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि शांत हिल स्टेशन कोणते?
गर्दी आणि प्रदूषण गर्दी आणि प्रदूषित हवेपासून लांब जाऊन शांततेत वेळ घालवायचा असेल तर माथेरानला जाण्याचा विचार करावा.
सुंदर हिल स्टेशन
माथेरान हे भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान आणि सुंदर असे हिल स्टेशन आहे.
टॉप हिल स्टेशन
माथेरान हे महाराष्ट्रातील टॉप हिल स्टेशन्सपैकी एक आहे. मुंबई-पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक वीकेंड ट्रिपसाठी येथे येतात.
शांत आणि स्वच्छ
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात माथेरान हे हिल स्टेशन आहे. जिथे तुम्ही शांत आणि स्वच्छ हवेत काही दिवस राहू शकतात.
सह्याद्रीच्या डोंगररांगा
माथेरान हे महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेले एक छोटेसे हिल स्टेशन आहे.
वाहनांना परवानगीहे ठिकाण जगातील अशा मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे धोकादायक रस्त्यांमुळे वाहनांना परवानगी नाही.
टॉय ट्रेन
येथे टॉय ट्रेनने जावे लागते. ही टॉय ट्रेन उंच पर्वतरांगांवरून अत्यंत अवघड वाटेवरून जाते.
दस्तुरी पॉइंटमाथेरानमधील दस्तुरी पॉइंटच्या पलीकडे कोणत्याही वाहनाला परवानगी नाही. येथून पर्यटकांना सुमारे अडीच किमीचे अंतर पायी किंवा घोड्यावरून जावे लागते.
व्ह्यू पॉइंट्समाथेरानला गेल्यास निसर्गाच्या अगदी जवळचा अनुभव येईल. येथे तुम्हाला ढगांनी वेढलेले पर्वत आणि सुंदर तलावासह अनेक व्ह्यू पॉइंट्स पाहायला मिळतील.