गुलाल आणि विविध रंगांशिवाय धूलिवंदनाचा सण साजरा करणं शक्य नाही. अनैसर्गिक रंगांमुळे त्वचेवर त्वचेवर रॅशेल, लाल पुरळ किंवा खाज येऊ शकते याशिवाय केसांच्याही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे होळीला नैसर्गिक रंगांचा वापर करणे फायदेशीर ठरते.
नैसर्गिक रंगांमुळे त्वचा आणि केसांसाठी सुरक्षित आहेत. यंदा पर्यावरणपूरक होळी खेळायची असेल, तर तुम्ही घरच्या घरी विविध फुलांचा वापर करून नैसर्गिक रंग बनवू शकता.
झेंडुची फूले झेंडुची पिवळी फुले किंवा झेंडुच्या लाल फुलांपासून पिवळा गडद आणि लालसर गडद रंग बनवता येतो. हे दोन्ही रंग बनवण्यासाठी सर्वात आधी ही फुले उन्हामध्ये वाळवा. त्यानंतर, मिक्सरमध्ये या सुकलेल्या फुलांच्या पाकळ्यांची बारीक पावडर करून घ्या. या पावडरमध्ये पाणी मिसळून यापासून पिवळा गडद किंवा लालसर रंग तयार करा.
जास्वंद आणि गुलाबाचे फूल लाल रंग प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे होळीमध्ये हा रंग सर्वाधिक वापरला जातो. होळीच्या दिवशी लाल रंगाचा तिलक लावण्याची परंपरा आहे. बाजारात तुम्हाला लाल रंग सहजपणे मिळू शकतो; परंतु जास्वंदाच्या फुलांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी नैसर्गिकरित्या लाल रंग घरीच तयार करू शकता.
कडुलिंबापासून बनवा हिरवा रंग हिरवा रंग हे उत्साहाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अनेक जण या रंगाचा वापर आवर्जून करतात. हिरवा रंग तयार करण्याकरिता सर्वप्रथम कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून वाळवा. त्यानंतर ही पाने मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करा. त्यामध्ये चंदन पावडर घाला. रंग लावण्यावेळी यामध्ये पाणी मिसळले की, नैसर्गिक हिरवा रंग तयार होतो.