तुमच्या आधार कार्डवर किती सिम सक्रिय आहेत आणि ते कसे निष्क्रिय करायचे? जाणून घ्या
सर्व प्रथम tafcop.dgtelecom.gov.in पोर्टलवर जा.
येथे बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा.
या प्रक्रियेचे स्टेप बाय स्टेप अनुसरण करा आणि तुमच्या आयडीवर किती सिम सक्रिय आहेत ते जाणून घ्या.
आता तुम्हाला तुमच्या आयडीवरून चालू असलेल्या सगळ्या नंबर्सची माहिती मिळेल.
एखादा अनोळखी नंबर या यादीत आढळल्यास, तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता - यासाठी नंबर निवडा आणि 'Not My Number'वर क्लिक करा.
आता खालील रिपोर्ट बॉक्सवर क्लिक करा. तक्रार दाखल केल्यानंतर, तुम्हाला तिकीट आयडी संदर्भ क्रमांक देखील दिला जातो. यानंतर तो नंबर बंद होईल किंवा तुमच्या आधार कार्डमधून काढून टाकला जाईल.