डेंग्यू आजारातून लवकर बरं व्हायचं असेल, तर खा ‘ही’ फळं

डेंग्यूचा ताप झपाट्याने पसरतो. ताप आल्यास रुग्णाला चांगली विश्रांती घेण्यास सांगितले जाते. लवकर बरे वाटावे व डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

किवी डेंग्यू झालेला असतांना किवी खाल्ल्याने चांगला परिणाम होतो. किवी हे फळ पोटॅशिअम, व्हिटॅमिन - ई आणि व्हिटॅमिन - ए यांचा समृद्ध स्त्रोत आहे. जे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखते.

डाळिंब डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. ते निरोगी ब्लड प्लेटलेट्सची संख्या अथवा प्रमाण राखण्यास मदत करते, जे डेंग्यूतून बरे होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

मालटा डेंग्यूच्या रुग्णांसाठी लिंबूवर्गीय अथवा सिटरस फळे नेहमीच फायदेशीर मानली जातात. माल्टामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. डेंग्यूमध्ये अनेकदा रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्या वेळी माल्टा उपयोगी ठरू शकते.

पपई डेंग्यूशी लढा द्यायचा असेल, तर पपईच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या पानांचा 30 मिली रस प्यायल्यास प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत होते.

नारळ पाणी नारळाचे पाणी पिण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. डेंग्यूपासून लवकर बरे होण्यासाठी भरपूर प्रमाणात द्रव पिण्याचा सल्ला दिला जातो, अशा वेळी नारळ पाण्याचे सेवन उपयुक्त ठरते.

ड्रॅगन फ्रूट हे फळ अँटिऑक्सिडंट्स, हाय फायबर आणि लोह, तसेच व्हिटॅमिन-सी यांचा समृद्ध स्त्रोत आहे. ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि डेंग्यूच्या तापापासून त्यांचे संरक्षण होते.

केळं केळं हे एक असे फळ आहे, जे पचण्यास अत्यंत सोपे आहे. डेंग्यूतून लवकर बरे होण्यासाठी रुग्णाला पचायला सोपे , पोषक तत्त्व असलेले पदार्थ व संतुलित आहार सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी-6 आणि व्हिटॅमिन-सी यांनी परिपूर्ण असलेले केळे खावे.