वैद्यकीय क्षेत्रात आता आयुर्वेद आणि होमिओपॅथीसाठीही विमा

IRDAIने सर्व विमा कंपन्यांना आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या उपचारांचा 'वैद्यकीय विमा पॉलिसी'मध्ये समावेश करण्यास सांगितले आहे

यामुळे विमा पॉलिसीची लोकप्रियता वाढेल आणि अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल

सामान्य विमा कंपन्यांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये आयुष उपचाराचाही समावेश करावा

यासाठी कंपन्या त्यांच्या बोर्डाची मंजुरी घेतल्यानंतर योग्य मार्गदर्शक तत्त्वे सादर करतील

सर्वसामान्य विमा कंपन्यांना 1 एप्रिल 2024 पर्यंत मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागतील

नवीन आर्थिक वर्षापासून हा विमा लागू होईल