केल ही पालकसारखी दिसणारी ही हिरवी पालेभाजी आहे. यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे असतात. ही भाजी विविध पद्धतीने खाऊ शकता. कच्ची, शिजवून किंवा सलाडमध्ये घालूनही केल भाजी खाणे आरोग्यासाठी हितकारक ठरू शकते. केलमध्ये इतर पालेभाज्यांपेक्षाही जास्त प्रमाणात जीवनसत्त्व सी असते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते तसेच जीवनसत्त्व के असल्याने हाडे मजबूत होतात.
ब्रोकोली स्प्राउट्स कर्करोगाचा धोका कमी करते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, ई, बीटा-कॅरोटीन, फोलेट आणि सेलेनियम यासारखी कर्करोगविरोधी पोषक तत्त्वे असतात शिवाय कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के हे घटकही असतात. यामुळे कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी आहारात ब्रोकालीचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
डँडेलियन या भाजीचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. यकृताचे आरोग्य सुधारते. शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्यास ही भाजी खाल्ल्याने मदत होते. यामध्ये बीटा कॅरेटीन हा अँटिऑक्सिडंटयुक्त घटक असतो. यामुळे जुनाट आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
वॉटरक्रेस ही सर्वात पौष्टिक भाजी आहे. यामध्ये सर्वात कमी कॅलरीज आणि सर्वात जास्त पोषक तत्त्वे असतात. वजनवाढीवर नियंत्रण, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात वॉटरक्रेस या भाजीचा समावेश करावा. वॉटरक्रेस खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, ग्लुकोसिनेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश करावा.