नववधूचा गृहप्रवेश करताना तांदळाचे माप का ओलांडले जाते?
नववधू
नववधू लग्न पूर्ण झाल्यानंतर तांदळाचा कलश पायाने आत ढकलून गृहप्रवेश करते.
शुभ विधी
लग्न झाल्यावर मुली नवऱ्याच्या घरी जातात, तेव्हा त्यांचा थाटात गृहप्रवेश होतो हा विधी अतिशय शुभ मानला जातो.
आनंद
हा विधि नव्या नवरीच्या स्वागताच्या वेळी केल्यास तिच्या घरात नेहमी सुख आणि समृद्धी नांदते....
गृहप्रवेश
नवीन नवरी तांदूळ भरलेले माप पायाने आत ढकलते तेव्हा त्यातील तांदूळ घरात विखुरले जातात.
समृद्धी
असे म्हणतात की नव्या लक्ष्मीने हे माप ओलांडल्यास त्या घरात समृद्धी येते.
उजवा पाय
उजवा पाय सकारात्मकतेचे प्रतिनिधित्व करतो आणि उजव्या पायाने हे माप ओलांडून नवी लक्ष्मी गृहप्रवेश करते...
सकारात्मकता
असे मानले जाते की जेव्हा नवीन नवरी या कलशला पाय मारते
तेव्हा
घरामध्ये सकारात्मकता येते.
आर्थिक लाभ
हिंदू धर्मात स्त्रीला देवीचे रूप मानले जाते. तांदूळ भरलेला कलश ओलांडल्याने घरात आर्थिक लाभ मिळू शकतो.
जीवनात यश
हा गृहप्रवेश केल्यानंतर नवदांपत्यांच्या जीवनात यशाची भरभराच होते.