आपल्या किलबिलाटाने आयुष्याचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व जपणं म्हणूनच गरजेचं आहे. नाही तर उद्याच्या पिढीला पुस्तकातून 'एक होती चिऊताई' असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करुया आणि इतरांनाही जागरुक करुया.