साहित्य :-

५०० ग्राम चिकन (स्वच्छ धुवून) १ कप ओला नारळ + १०-१२ लसूण पाकळ्या + २ कांदे यांचे वाटण १/२ कप चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून मालवणी गरम मसाला १/२ टेबलस्पून लाल तिखट १/२ टीस्पून बडीशेप पावडर १/४ टीस्पून हळद ३-४ टेबलस्पून तेल चवीनुसार मीठ

१/२ कप दही (ऐच्छिक) १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट १/४ टीस्पून हळद १/४ टीस्पून लाल तिखट

मॅरीनेशन साहित्य:

स्टेप १

प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला मॅरीनेशन साहित्य लावून १५ मिनीटे झाकून ठेवा.

स्टेप २

नंतर एका कढईमधे तेल गरम करुन त्यात, ओला नारळ+लसूण+कांदे यांचे वाटण घालून चांगले कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

स्टेप ३

मग त्यात मालवणी गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि बडीशेप पावडर घालून पुन्हा चांगले परतून घ्या.

स्टेप ४

आता परतून झालेल्या मसाल्यात, मॅरीनेट केलेले चिकन आणि १/२ कप पाणी (जरुर असल्यास) घालून ४-५ मिनीटे झाकून शिजवा.

स्टेप ५

चिकन मसाला रस्सेदार पाहिजे असेल तर आवश्यकतेनुसार पाणी घालावे नाहीतर घट्टसर ठेवावे आणि कोथिंबीर गार्निश करा.

स्टेप ६ 

भात, चपाती किंवा तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करा.