रंगीबेरंगी फुलांची सजावट गुढीपाडव्यानिमित्त घर सुंदर पद्धतीने सजवण्यासाठी फुलांची मदत घेऊ शकता. रंगीत फुलांचा वापर करून तुम्ही आकर्षक सजावट करू शकता. घरातील कॉर्नरमध्ये सुगंधी आणि रंगीत फुले ठेऊ शकता तसेच घरातील दारांवर फुलांच्या माळा लावू शकता.
तोरण गुढीपाडव्याच्या निमित्ताने घर आकर्षक पद्धतीने सजवायचे असेल, तर प्रत्येक खोलीच्या दारावर तोरण लावू शकता. यासाठी झेंडूचे फुल किंवा आंब्याच्या पानांचा वापर करू शकता. तोरण लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याशिवाय तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवरचे तोरण बाजारात मिळतील.
देवघराची सजावट गुढीपाडव्यानिमित्त देवघराची सजावट करू शकता. या शुभ मुहूर्तावर देवघर स्वच्छ करून सुगंधी फुलांनी सजवू शकता. फुलांनी रांगोळी डिझाईन करूनही तुम्ही मूर्ती सजवू शकता. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या फुलांचे हारही देवघरावर लावू शकता.
सुंदर रांगोळी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रांगोळी काढून घराचे सौंदर्य वाढवू शकता. विविध रगांनी किंंवा फुलांची सुंदर रांगोळी काढू शकता. यासाठी झेंडू आणि गुलाबाच्या फुलांचा वापर करू शकता. गुढीपाडवा रांगोळीच्या अनेक डिझाईन्स तुम्हाला नेटवर मिळतील.