दातांवरील पिवळेपणामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. दात स्वच्छ करण्यासाठी महागड्या टुथपेस्ट वापरल्या जातात, पण प्रत्येकवेळी या एकाच उपायाचा अवलंब करण्याबरोबरच आयुर्वेदातील 'या' पदार्थांचा वापर केल्यास दातांना किड लागणे, हिरड्या दुखणे, तोंडाची दुर्गंधी इत्यादी त्रास दूर होऊ शकतात.
तुळशीची पाने आणि सुकलेली संत्र्याची साल तुळशीच्या पानांची आणि सुकलेल्या संत्र्याच्या सालीची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट दातांवर २० मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने दात स्वच्छ करा. असे केल्याने दातांवरील पिवळा प्लेक निघून जाण्यास मदत होऊ शकते.
बेकिंग सोडा आणि पाणी २ चमचे बेकिंग सोड्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ५ मिनिट दातांवर राहू द्या. त्यानंतर तोंड स्वच्छ धुवा. रात्री झोपण्यापूर्वी नियमित केल्याने दात पांढरे शुभ्र होऊ शकतात.
मीठ आणि लिंबाचा रस चिमूटभर मिठात लिंबाचा रस घालून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टने दात स्वच्छ करा. ब्रश करताना फक्त हिरड्यांची काळजी घ्या. असे रोज केल्याने दातांवरील पिवळेपणा दूर होऊ शकतो.
ऍपल सायडर व्हिनेगर आणि गरम पाणी ग्लासभर कोमट पाण्यात २ चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. या पाण्याने गुळण्या करा. असे आठवड्यातून एकदा केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.