Mango Variety : केवळ हापूसच नव्हे तर 'हे' आंबेही आहेत प्रसिद्ध
हापूस आंबा(Alphonso mango)
हापूस आंबा म्हणजे अस्सल कोकणी आंबा म्हणून ओळखला जातो. बाजारात मुख्यत: रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस यांना मोठी मागणी असते.
केसर आंबा(Kesar Mango)
केसर आंब्याला केसरी असंही म्हणतात. हा आंबा अतिशय गोड असल्याने याला 'आंब्याची राणी' म्हटलं जातं. केसर आंबा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय आंबा आहे.
तोतापुरी आंबा (Totapuri Mango)
तोतापुरी आंब्याला बंगनापल्ली, बंगलोर आंबे असंही म्हणतात. कच्च्या तोतापुरी आंब्याचा वापर चटणी आणि लोणची बनवण्यासाठी केला जातो. हे आंबे व्यावसायिक प्रक्रियेसाठी लोकप्रिय आहेत.
लंगडा आंबा (Langra Mango)
लंगडा आंबा हा अतिशय रसाळ आणि गोड असतो. तसेच भारतात वेगवेगळ्या भागांमध्ये लंगडा आंब्याचं उत्पादन घेतलं जातं, पण बनारसचा लंगडा आंबा सर्वात प्रसिद्ध आहे.
बॉम्बे ग्रीन आंबा (Bombay Green Mango)
बॉम्बे ग्रीन आंबा बाजारात 'कैरी' म्हणून ओळखला जातो. हा आंबा लोणची आणि इतर पाककृती करण्यासाठी वापरला जातो. याचं उत्पादन आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घेतलं जातं.