किचनमधील या वस्तू कधीच फेकून देऊ नका

घरी बाजारातून आणलेल्या अनेक वस्तू आपण एक्स्पायरी डेट बघून घेतो. साधारण, पॅकेट वस्तू सॉस अशा वस्तूंबाबत आपण रिस्क घेत नाही.

कॉर्नफ्लोअर तुम्ही काही नाश्त्याचे पदार्थ बनवण्यासाठी कॉर्नफ्लोअर घरी आणत असाल. काही दिवस ठेऊन ते खराब झाले म्हणून फेकून देत असाल तर तसं करू नका. कारण, कॉर्नफ्लोअर कधीच खराब होत नाही. फक्त तो हवाबंद काचेच्या डब्यात ठेवा. म्हणजे त्याला किड लागणार नाही.  

सोया सॉस सोया सॉस शिवाय चायनिज फूड तयारच होत नाही. घरी बनलेल्या फ्राईड राईस, मंच्युरियन आणि नुडल्समध्ये हा सॉस सर्रास वापरला जातो. तुम्हीही बाजारातून आणलेला सॉस खराब झाला म्हणून फेकून देत असाल तर आधी हे लक्षात घ्या. कारण, सोया सॉस कधीच खराब होत नाही.

व्हिनेगर व्हिनेगर हे कोशिंबिर, लोणचे यासाठी तर पॅकेट फूड असलेल्या टोमॅटो केचअप, सॉस, मेयोनीज यामध्ये वापरले जाते. घराची स्वच्छता, एखाद्या भांड्याला चमकवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. असे हे व्हिनेगर कधीच खराब होत नाही. फक्त काळजी घ्यावी की ते तुम्ही योग्य प्रकारे साठवून ठेवाल.

मध आयुर्वेदीक औषध असो वा ब्युटी टीप्स सगळ्याच गोष्टीत मध वापरले जाते. आजकाल झाडावरून तोडलेला ताजे मध ग्रामिण भागात मिळते. पण शहरात मात्र प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पॅक केलेले मध मिळते. त्या पाकिटावर त्याची एक्स्पायरी डेटही असते. असे असले तरी हे लक्षात घ्या की मध कधीही खराब होत नाही.