दक्षिण कोरिया 'ग्वांगबो-कजेओल' म्हणजे 'प्रकाश दिन' हा दिवस 'स्वतंत्रता दिन' म्हणून १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. जपानी राजवटीतून मुक्त झाल्याच्या स्मरणार्थ समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह हा दिवस साजरा केला जातो.
उत्तर कोरिया डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया देशाची निर्मितीही १५ ऑगस्ट १९४५ रोजी झाली होती. हा दिवस उत्तर कोरियामध्ये लिबरेशन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात लष्करी परेड, भाषण आणि इतर देशभक्तीपर कार्यक्रम होतात.
काँगो फ्रेंच राजवटीने १९६९ ते १९९२ पर्यंत ८० वर्षे काँगोवर राज्य केले. १५ ऑगस्ट १९६० रोजी काँगो देशाने फ्रान्सपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले. हा दिवस काँगोमध्ये 'राष्ट्रीय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
लिकटेंस्टाईन लिकटेंस्टाईनमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि अस्मितेचा वार्षिक उत्सव म्हणून ओळखला जातो. औपचारिक भाषण, कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्सव म्हणून हा दिवस साजरा होतो.
बहारीन १९३१ मध्ये तेल शोधून रिफायनरी स्थापन करणाऱ्या पहिल्या आखाती राज्यांपैकी बहारीन हा पहिला देश. तेल मिळवण्यासाठी युनायटेड किंग्डमने बहारीन ताब्यात घेतले होते. तब्बल ४८ वर्षांनंतर १५ ऑगस्ट १९७१ रोजी बहारीन स्वतंत्र झाला.