प्राचीन कोकण संग्रहालय ५०० वर्षांपूर्वीच्या कोकणातल्या जीवनशैलीचे दर्शन एका छताखाली. संग्रहालयात कोकणातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संस्कृतीचे दर्शन.
गणपतीपुळे
आंबा, काजू, नारळ, पोफळी व वनस्पतींच्या हिरवळीने नटलेले ठिकाण. निसर्ग सौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा. श्री गजाननाचे स्वयंभू देवस्थान तसेच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध.
केशवराज मंदिर
१००० वर्षे जुने असे केशवराज (विष्णूचे) मंदिर. मंदिराची रचना उत्तम दगडी बांधकाम. देवळाच्या आवारात दगडी गोमुख. तेथून १२ महिने पाणी वाहते.
दीपस्तंभ
जयगड लाईट हाऊस हे एक ऐतिहासिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना. ब्रिटिशांनी १९३२ मध्ये बांधला. अरबी समुद्राचे संपूर्ण ३६० अंशांचे दृश्य दिसते. रात्रीच्या वेळी पर्यटकांचा जास्त ओढा.
आरे-वारे समुद्रकिनारा
आरे आणि वारे गावाच्या सीमेवर डोंगरावरून समुद्राचे मोहक दृष्य पाहता येते. समुद्राचे अथांग पसरलेले निळेशार पाणी दिसते. म्हणून हा समुद्रकिनारा 'निळा समुद्र' म्हणून ओळखला जातो.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कोठडीपतितपावन मंदिर परिसरात वीर सावरकर यांचे स्मारक. क्रांतिकारकांची माहिती देणारे 'गाथा बलिदानाची' हे प्रदर्शन. वीर सावरकारांची काठी, चष्मा, लंडनहून पाठविलेली पिस्तुले आदी वस्तूंची प्रदर्शन.
आंजर्ले समुद्रकिनारा
पांढऱ्या शुभ्रवाळूने आच्छादलेला स्वच्छ समुद्रकिनारा. आंजर्ले समुद्रकिनाऱ्यासह उजव्या सोंडेचा गणपती म्हणून ‘कड्यावरचा गणपती’ हे मंदिर पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण.