दिल्लीतील उच्च तापमानामागील कारणे

दिल्ली वाढत्या उष्णतेने ग्रासली असून  कमाल तापमान ५० अंशांच्या पुढे गेलं आहे.

IMDने पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेच्या स्थितीपासून दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे.

पण दिल्लीत तापमानवाढ का?

दिल्लीतील तापमानवाढीबाबत IMDने कोरडे आणि उबदार हवामान, पावसाची कमतरता, प्रदूषण इत्यादी कारणे सांगितली आहेत.

IMDच्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात कमाल तापमान ४५ ते ५० अंश सेल्सियस असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशभरात यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, अशी शक्यताही IMDने व्यक्त केली आहे.