संतश्रेष्ठ श्री
निवृत्तीनाथ महाराज
यात्रोत्सव
पौष कृष्ण नवमीपासून पौषवारी महोत्सवाला सुरुवात होते.
९ तारखेपर्यंत मंदिरात दररोज पहाटे काकड आरती, पूजन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन होते.
राज्यभरातून सुमारे ७५० दिंड्या सोमवारी सायंकाळपर्यंत त्र्यंबकेश्वरनगरीत पोहोचल्या आहेत.
यंदा निवृत्तीनाथांचे सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी जन्म वर्ष आहे. त्यामुळे दिंड्यांची संख्या सहाशेवरून साडेसातशेवर पोहोचली आहे.
परंपरागत नोंदणीकृत ४६८ दिंड्या या यात्रोत्सवात सहभागी झाल्या आहेत.
९ फेब्रुवारीला पहाटे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होईल.
हजारो वारकर्यांची उपस्थिती, टाळ-मृदंगाचा गजर आणि संत-हरिनामाच्या जयघोषाने शहर, परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.