शेख हसीना आश्रयासाठी भारतात; याआधी कोणाकोणाला दिलेला आश्रय?

तिबेट :  तिबेट-चीनच्या विलीनीकरणानंतर दलाई लामांसह अनेक तिबेटींनी १९५० -१९५९पर्यंत भारतात घेतलेला आश्रय.

बांगलादेश:  बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान सुमारे १० दशलक्ष बांगलादेशी (पूर्व पाकिस्तानी) युद्धापासून वाचण्यासाठी भारतात आलेले. 

श्रीलंका:   श्रीलंकेच्या गृहयुद्धादरम्यान (१९८३-२००९) श्रीलंकेतील अनेक तमिळींनी भारतात घेतलेला आश्रय. 

अफगाणिस्तान:  १९७९ मध्ये अफगाणिस्तानवर सोव्हिएत आक्रमणानंतर, तसेच २०२१ मध्ये तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अनेक अफगाणांनी भारतात घेतलेला आश्रय. 

 भूतान:  भूतानमधील वांशिक तणाव आणि सरकारी धोरणांमुळे १९८० च्या उत्तरार्धात ल्होत्शाम्पा समुदायातील लोक भारतात आले होते.