स्वप्नील कुसाळेचा ऐतिहासिक विजय; ७० वर्षांनंतर महाराष्ट्रात आले ऑलिम्पिक पदक
कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी हे स्वप्नीलचे मूळ गाव आहे
कांबळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वप्नीलचे प्राथमिक शिक्षण झाले.
2009 साली सांगलीतील क्रीडा प्रबोधिनीत त्याला प्रवेश मिळाला आणि त्याचं नेमबाजीचं प्रशिक्षण सुरु झालं.
त्यानंतर नाशिकमधील मिलिटरी स्कूलमध्ये त्यानं नेमबाजीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले.
2015 साली भारतीय रेल्वेत त्याची क्रिडा कोट्यातून 'टीसी' म्हणून नियुक्ती झाली.
त्याचवर्षी, 2015 साली कुवैतमधील आशियाई नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल प्रकारात त्याने सुवर्ण पदक जिंकले.
त्यासोबतच राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक कमावले.
2022 मध्ये कैरो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत चौथ्या क्रमांकासह त्याला ऑलिम्पिक कोटा प्राप्त झाले.