चिनाब ब्रिज कसा बनला जगातील सर्वात अनोखा आणि अतुलनीय पूल?

१७ जून २०२४ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच आर्च ब्रिजवर (पुलावर) रेल्वे इंजिनची प्रथमच चाचणी घेण्यात आली.

चिनाब नदीवर बांधलेला आर्च ब्रिज 359 मीटर उंच आहे. त्याची उंची ५ कुतुबमिनार एवढी आहे. पॅरिसचा आयफेल टॉवर, ज्याची उंची 324 फूट आहे, तो देखील या पुलासमोर लहान दिसतो.

हा पुल कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यास सक्षम आहे. तो कोणत्याही बॉम्बस्फोटाला तोंड देऊ शकतो. 266 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही त्यावर काहीही परिणाम होणार नाही.

इतकंच नाही तर ८ रिक्टर स्केलच्या भूकंपाचाही या पुलावर काही परिणाम होणार नाही, तर त्यावर ताशी १०० किलोमीटर वेगाने ट्रेनदेखील चालू शकणार आहे. याशिवाय -10 अंश ते 40 अंशांपर्यंतच्या तापमानाचा या पुलावर कोणताही परिणाम होणार नाही.

या अनोख्या पुलाच्या निर्मितीमुळे काश्मीर खोऱ्यातील प्रवास ४ ते ५ तासांनी कमी होणार आहे.