अयोध्येतील भव्यदिव्य श्रीराम मंदिर पारंपरिक आणि भारतीय वास्तुकलेचे मिश्रण
मंदिराची रचना अयोध्येतील राम मंदिराची रचना चंद्रकांत सोमपुरा यांनी नागरा शैलीनुसार केली आहे. उत्तर भारतातील मंदिरांमध्ये अशा पद्धतीची रचना असते.
टाइम कॅप्सूल टाइम कॅप्सूल जमिनीपासून सुमारे २,००० फूट खाली ठेवण्यात आले आहे. कॅप्सूलमध्ये राममंदिर, भगवान राम आणि अयोध्या यांच्याशी संबंधित माहिती असलेली तांब्याने कोरलेली पाटी ठेवण्यात आली आहे.
लोखंड किंवा स्टीलचा वापर नाही मंदिराचे एकूण क्षेत्रफळ २.७ एकर आहे. मंदिरात लोखंड किंवा स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही. याचे कारण म्हणजे लोहाचे (लोखंडाचे) आयुष्य फक्त ८०-९० वर्षे असते.
उत्तम दर्जाचे सिमेंट आणि चुनाबांधकामाकरिता उत्कृष्ट दर्जाचे ग्रॅनाइट, सँडस्टोन आणि संगमरवर वापरण्यात आले आहे. मंदिराकरिता उत्तम दर्जाचे सिमेंट किंवा चुन्याचादेखील वापर करण्यात आला आहे.
वालुकामय जमिनीवर शास्त्रज्ञांचा उपाय शास्त्रज्ञांनी प्रथम मंदिराच्या संपूर्ण परिसराची माती १५ मीटर खोलीपर्यंत खणली. या भागात १२ ते १४ मीटर खोलीपर्यंत इंजिनीयर्ड माती टाकण्यात आली होती. यामध्ये कोणत्याही स्टीलच्या री-बारचा वापर करण्यात आलेला नाही.
भूकंप-प्रतिरोधकहे मंदिर भूकंप-प्रतिरोधक असून मंदिराचे आयुष्य तब्बल २५०० वर्षे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.