हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारावर 'हे' ५ सोपे घरगुती उपाय !

हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका हे तिन्ही आजार एकमेकांशी संबंधित आहेत. जर तुम्हाला तुमचे हृदय मजबूत ठेवायचे असेल, तर 'या' तीन गोष्टी टाळणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब हे उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका या दोन्हींचे लक्षण असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच जर ते सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल, तर आयुर्वेदातील 'या' ५ पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

लसूण लसूण दररोज सकाळी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.  NCBIच्या संशोधनानुसार, लसणामध्ये कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करणारे घटक असतात.

त्रिफळा त्रिफळा हे आयुर्वेदिक औषध आहे. यामुळे अनेक रोगांपासून बचाव होण्यास मदत होते. दररोज २ चमचे त्रिफळा चूर्ण घेतल्याने रक्तदाब पूर्ववत होतो आणि रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होतो.

ओवा ओवा फक्त 'माउथ फ्रेशनर' आहे, असे नाही, तर ओवा हे स्ट्रेस हार्मोन्सचे उत्पादन कमी करण्यासदेखील फायदेशीर ठरते.  ओवा खाल्ल्याने रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि रक्तदाब वाढत नाही.

आवळा आवळा या फळाला 'सुपर हेल्दी फूड', असेही म्हटले जाते. आवळा खाल्ल्याने केस, त्वचा आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते. 

अर्जुन साल  अर्जुन साल हे आयुर्वेदातील प्रभावी औषध मानले जाते. यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण येऊ शकते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्यापासून  प्रतिबंध होतो. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहायला मदत होते.