आदियोगी शिव प्रतिमा ळनाडू राज्यातील कोईम्बतूरमध्ये असलेली भगवान शंकराची ही भव्य आदियोगी स्वरूपातील मूर्ती प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर आदियोगी मूर्तीचे विविध फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात. या भव्य आणि दिव्य मूर्तीचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
कैलासनाथ महादेव प्रतिमा कैलासनाथ महादेवाची ही मूर्ती भारतीय सीमेजवळील सांगा (नेपाळमधील गाव) या गावी आहे. या मूर्तीचा रंग सोनेरी असून ही मूर्ती नेपाळमधील सांगा या गावात आहे. येथील मंदिराला कैलासनाथ महादेव मंदिर असे म्हटले जाते.
हरिद्वार येथील महादेवाची मूर्ती उत्तराखंड राज्यातील प्रसिद्ध हरिद्वार शहरात महादेवाची भव्य मूर्ती पाहायला मिळते. 'हर की पौडी'च्या गंगा घाटावर भगवान शिवाची ही भव्य मूर्ती विराजमान आहे. तब्बल १०० फूट उंच असलेली ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करतात.