बीट शरीराचा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी बीटचा आहारात समावेश करावा. यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराचा थकवा दूर करतात. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. बीटचा रस किंवा ते सॅलडमध्ये टाकून सेवन करू शकता.
दालचिनीचे पाणी शरीराचा अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी दालचिनीचा वापर करू शकता. यासाठी सकाळी दालचिनीचा एक छोटा तुकडा पाण्यात उकळून प्यावा. तसेच तुम्ही दालचिनीची पावडर देखील वापरू शकता.
लिंबू पाणी लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. शरीराचा थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी लिंबू पाणी फायदेशीर ठरते. यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबू टाकावे, थोडे मीठ टाकावे आणि त्याचे सेवन करावे. यामुळे दिवसभर तुम्हाला ऊर्जावान वाटेल.
चीया सीड्स आहारात चीया बियांचा समावेश केल्याने शरीराचा थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. यासाठी चीया सीड्स पाण्यात मिक्स करून सेवन करू शकता. हे पाणी प्यायल्याने दिवसभर थकवा जाणवणार नाही. तसेच पचनसंस्था सुरळीत कार्य करते.