मुंबई दर्शनासाठी 'ही' टॉप ७ ठिकाणे, नक्की भेट द्या !

गेटवे ऑफ इंडिया   १९२४ मध्ये पाचवे किंग जॉर्ज आणि राणी मेरी दे दोघे ज्या ठिकाणी भेटले, त्यांच्या भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे सीएसएमटी रेल्वे स्थानक हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हे मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.

एलिफंटा गुहा मुंबई हार्बरमधील एलिफंटा बेटावर स्थित या गुहा ५व्या ते ८व्या शतकातील आहेत आणि येथे महादेवाचे प्राचीन दगडी मंदिरे आहेत.

मुंबई उच्च न्यायालय १८७८ मध्ये बांधलेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत हे वास्तुकलेचे प्रभावी उदाहरण आहे. मुंबईच्या न्यायालयीन इतिहासात त्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.

धोबी घाट महालक्ष्मी येथील धोबी घाट हा जगातील सर्वात मोठा धोबी घाट आहे आणि तो एक शतकाहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे.

महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. पर्यटक आणि भक्तांसाठी आकर्षणाचे स्थळ आहे.

फ्लोरा फाउंटन मुंबईच्या फोर्ट परिसराच्या मध्यभागी असलेले फ्लोरा फाउंटन हे १८६४ मध्ये बांधलेले एक सुंदर स्मारक आहे. त्याचे नाव रोमन देवी फ्लोराच्या नावावरून ठेवण्यात आले होते.