वंदे भारत ट्रेनची संकल्पना आणि प्रत्यक्षात परिचालन यासंदर्भात बोलताना वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीबाबत रेल्वेमंत्री यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
आताच्या घडीला देशभरात ८२ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत.
नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-हावडा या मार्गांवर चालवल्या जात असलेल्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १६० किमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वंदे भारत ट्रेनबाबत अनेक देशांनी चौकशी केली आहे. अनेक देशांना वंदे भारत ट्रेन हवी आहे.
त्यामुळे येत्या काही वर्षात भारत हा इतर देशांना वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन निर्यात करण्यास सक्षम असेल, असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि संरक्षणासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.