मधाचे गाव!

राज्यात लवकरच १६ जिल्ह्यांत मधाचे गाव उभारले जाणार आहे.  या १६ जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर आणि सातारा यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे

मधमाशा या केवळ मध आणि मेणच देत नाहीत तर त्या परपरागीकरणामुळे शेती पीक उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ करतात

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मे २०२२ रोजी महाबळेश्वर तालुक्यात मांघर हे देशातील पहिले मधाचे गाव म्हणून विकसित झाले

तसेच सरकारतर्फे मधपेट्या विकत घेण्यासाठी तब्बल ८० टक्के अनुदान देण्याचीही घोषणा नुकतीच करण्यात आली

मंत्रिमंडळ बैठकीत  राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या योजनेला प्रत्येक गावात ५४ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मान्यता दिली आहे

मंडळाकडून इच्छुकांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले जाते तसेच मधपेट्यांच्या उभारणीपासून त्यात तयार होणाऱ्या मधाची खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून केली जाते

राज्यातील वनसंपदा, शेतीपिके, तेलबियांचे क्षेत्र, फळबागायती पिके व त्यातून मिळणाऱ्या फुलोऱ्यातून २.५० लाख वसाहतींचे संगोपन केल्यास वार्षिक  १५ लाख किलो मध मिळू शकते

सामान्य नागरिकही मधाचा व्यवसाय करून उत्कर्ष साधू शकतात