आज व्यास पौर्णिमा आणि त्यानिमित्ताने आम्ही आज तुम्हाला श्री सौनक यज्ञशाळा येथे घडलेला इतिहास सांगणार आहोत.
छायाचित्र : दिवाकर नेने
कृष्णद्वैपायन हे पराशर ऋषींचे पुत्र. अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेले हे बालक होते. इतर शिष्यांपेक्षा कमी कालावधीत त्या काळातील सर्व वेदांताचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते.
त्यामुळे त्यांना वेद ज्ञानाचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली. ज्यामुळे या वेदांचा अभ्यास लोकांसाठी सोपा होईल आणि जीवन त्यायोगाने सफल करता येईल.
छायाचित्र : दिवाकर नेने
काळाच्या ओघात यात अनावश्यक असलेला भाग काढून टाकावा, असेही त्यांना वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी आपले शिष्य तयार केले व त्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद व त्याला पूरक असे साहित्य, उपनिषदे तयार करण्याची जबाबदारी दिली.
ही सर्व जबाबदारी पार पाडून कृष्णद्वैपायन यांनी सर्व ऋषी , देवर्षी व त्या काळातील राजे यांचा विश्वास संपादन केला. या त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना महर्षि 'व्यास' असे संबोधले जाऊ लागले.
'नैमिषारण्य' ही अनेक देवर्षी व ऋषी यांच्या तपश्चर्येने पावन झालेली भूमी. या भूमीवर सर्व ऋषी, राजे, सामान्य जनता यांच्या संमतीने अथवा मान्यतेने कृष्णदैपायन यांना 'व्यास' ही पदवी दिली गेली. या ठिकाणी एक वटवृक्ष आहे की, जो त्या काळापासून आहे असे मानले जाते.