काजू खाल्यामुळे वजन वाढते का?

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना काजू खायला आवडतात. काजू चवीला स्वादिष्ट असतात. याच कारणामुळे इतर ड्रायफ्रुट्सपेक्षा काजू अधिक लोकप्रिय आहेत.

काजू हा अत्यंत पौष्टिक असून, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

काजूचे सेवन केल्याने आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला मिळतात; जे मेंदूच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

त्याशिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, हाडे व स्नायू मजबूत करणे आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास काजू मदत करतात.

काजू इतर ड्रायफ्रूट्सप्रमाणे नाही. त्यात कॅलरीचे प्रमाण अधिक असते. 

प्रमाणाबाहेर काजूचे सेवन केल्यामुळे वजन वाढू शकते; पण संतुलित आहाराचा भाग म्हणून एका ठरावीक प्रमाणात काजूचे सेवन केल्याने वजन वाढत नाही.

डाएटिशियन सिद्राह सांगतात, "काजू हे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. कारणे- काजूमध्ये चांगले फॅट्स, फायबर व प्रोटिन्स असतात; जे भूक नियंत्रित करण्यास मदत करतात.