ट्रेनच्या तिकिटावर लिहिलेला PNR वरून वेटिंग चेक केली जाते. पण याचा फुलफॉर्म माहिती आहे का?
पीएनआरचा फुलफॉर्म आहे पॅसेंजर नेम रेकॉर्ड..पीएनआरमध्ये 10 नंबर असतात. यात प्रवाशाची माहिती दडलेली असते.
पीएनआरच्या 10 नंबरमध्ये प्रवाशाचं रिझर्व्हेशन सिस्टम, नाव आणि त्याच्या प्रवासाची माहिती असते.
'पीएनआर नंबरमुळेच ट्रेनचं वेटिंग स्टेटस कळं. त्यामुळे हा नंबर आवश्यक आहे.
पीएनआरच्या माध्यमातून एसएमएस सेवा आणि इंडियन रेल्वेच्या वेबसाईटवरून स्टेटस समजू शकतो.
10 अंकी PNR क्रमांकाचे पहिले तीन अंक हे रेल्वे क्षेत्र दर्शवतात जिथून रेल्वे तिकीट बुक केले गेले आहे.
PNR क्रमांक प्रथम विमान कंपन्यांनी वापरला, जेणेकरून विमान कंपन्यांना त्यांच्या प्रवाशांची संपूर्ण माहिती मिळू शकेल. मात्र, नंतर रेल्वेने त्याचा उपयोग केला.