युगंधर : शिवाजी सावंत यांचीच दुसरी कादंबरी ही प्रभू श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित आहे. पुराण आणि चमत्कारामध्ये अडकून पडलेल्या श्रीकृष्णाचं शिवाजी सावंत यांनी या कादंबरीतून सहज व तितकच विराट दर्शन घडवले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी वाचत असताना श्रीकृष्ण कोणी भगवान, परमात्मा न राहता तो कधी आपला सखा बनून जातो हे आपल्याला कळतच नाही.
श्रीमान योगी : रंजीत देसाई लिखित छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत श्रीमान योगी ही कादंबरी. खरे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्त थरारक आणि अद्भुत जीवन पुस्तकाद्वारे मांडणे म्हणजे केवळ अशक्य. पण रंजीत देसाई यांनी हे शिवधनुष्य त्यांच्या लिखाणातून पेलले आहे आणि म्हणूनच हे प्रेरणादायी स्रोत असलेले पुस्तक आपण नक्कीच वाचावे.