यमुना नदी स्वच्छता मोहीम सुरू..
यमुनेतून आतापर्यंत १३०० मेट्रिक टन कचरा काढण्यात आला आहे.
दिल्लीतील सर्व नाले एसटीपीशी जोडले जातील आणि त्यांची क्षमता वाढवली जाईल, जेणेकरून घाणेरडे पाणी यमुना नदीच्या पात्रात जाणार नाही.
रासायनिक कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता यावी म्हणून औद्योगिक क्षेत्रात CTP (सामायिक प्रक्रिया संयंत्रे) बसवण्यात येतील.
आयटीओ बॅरेजच्या गेट्सची दुरुस्ती, ऑइलिंग आणि सुरक्षा भिंतींची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे.
यमुनेच्या काठाची स्वच्छता करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली जात आहे.
यमुना रिव्हरफ्रंट विकसित करण्याचे कामही डीडीएने सुरू केले आहे.