पावसामुळे परिसरात साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारखे आजार निर्माण होतात. यामुळे घराभोवती स्वच्छता ठेवणे गरजेचे असते तसेच तज्ज्ञांच्या मते, काही रोपे घरात लावल्यास डास दूर राहतात. यामुळे 'झिका विषाणू'चा वाढता प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

रोजमेरी रोजमेरीचा चहा आरोग्यदायी असतो. रोजच्या आहारात रोजमेरीचा समावेश केला जातो. याच्या वासामुळे डास पळून जातात. या रोपाची काळजी घेणे सोपे असते. घरात एखाद्या कुंडीत किंवा भांड्यातही रोजमेरीची रोपे वाढवता येऊ शकतात. 

लॅव्हेंडर लॅव्हेंडरचा सुगंध अनेक लोकांना आवडतो. हा सुगंध डासांना दूर ठेवतो. घराभोवती किंवा खिडकीजवळ लॅव्हेंडरचे रोप लावलेली कुंडी ठेवल्यास डास दूर राहतात.

लेमन ग्रास लेमन ग्रासमुळे डास दूर राहतात. याला लिंबासारखा वास असतो. त्यामुळे किटक दूर राहतात. घरात किंवा बागेत ही रोप लावू शकता.

झेंडू झेंडूच्या फुलांचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. झेंडुच्या वासामुळेही डासांच्या त्रासावर मात करता येते. डासांना या फुलांचा वास आवडत नाही. त्यामुळे झेंडुची झाडे घराभोवती परिसरात लावल्यास डासांच्या त्रासापासून सुटका होऊ शकते. 

पुदिना पुदिना सहज कुठेही लावता येतो. पुदिन्याची रोपे जिथे ऊन आहे तिथे उगवतात.  घरातील कुंडीमध्ये पुदिना लावून ही कुंडी गॅलरीत, ग्रीलमध्ये ठेवा. पुदिन्याचा वापर चटणी किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. पुदिन्याच्या सुगंधामुळे डासांचा त्रास टाळता येतो. 

तुळस तुळशीला हिंदु धर्मात खूप महत्त्व आहे. तुळशीचे रोप अनेकांच्या घरी असते. तुळशीचा वापर औषधांपासून ते अनेक कामांसाठी केला जातो. तुळशीचे रोप ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात सोडते. जेथे तुळशीची रोपे किंवा तुळशी वृंदावन आहे तेथे डास येत नाहीत.