राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. मंगळवारी सभागृहात हास्यकल्लोळ पाहायला मिळाला आणि याचे कारण होते आदित्य ठाकरे यांचे लग्न. आमदार बच्चू कडू यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विषय काढून एक मिश्किल टिपणी केली, ज्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. याला आदित्य ठाकरेंनीही उत्तर दिले.
नक्की काय घडले?
सभागृहात प्रश्न उपस्थित करत असताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, राज्यभरात दरवर्षी २५ ते ३० टक्के प्रकल्प बाद होतात, मोठे-मोठे प्रकल्प उभे राहतात आणि काही कारणास्तव फेल होतात. याच्यामध्ये ताईंचा जो दुसरा प्रश्न आहे, तो विस्थापित होऊन जातो. कामगार रस्त्यावर येतात, शेतकरी रस्त्यावर येतात. राज्याच काहीतरी धोरण असले पाहिजे का नाही? आपण धोरण आखले पाहिजे. जर एखादा मोठा प्रकल्प होतोय, यासाठी कामगार बिचारे आपले गाव सोडून तिथे जातात. आणि प्रकल्प बंद पडला की सगळे कुटुंब रस्त्यावर येत. त्यामुळे प्रकल्पाची गुंतवणूक करताना या कामगारांसाठी काही ठेवता येईल का? किंवा त्या शेतकऱ्यांसाठी काही करता येईल का? हे धोरण असणे फार महत्त्वाचे आहे. आता आपण पाहतोय आमच्या गावाची एक मील बंद झाली, त्यांनी आता काय करावे? लग्न कामगार आहे म्हणून केले आणि आता लग्न तुटले, तर याला कोण जबाबदार? तुम्ही तरी सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे ना याच्यासाठी, काही धोरण आखणार आहे का? हा मुळ प्रश्न आहे.
या प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटले तर त्याला सांभाळायची जबाबदारी सरकारची. पण आपण जी सूचना केलीये, ती जरूर तपासून पाहता येईल. आणि त्यासंदर्भात काही धोरण करता येईल का? बघू.
पुढे फडणवीस मिश्कील टिपणी करताना म्हणाले की, पहिल्यांदा तर बच्चू कडू यांनी प्रश्न आदित्य ठाकरेंकडे पाहून विचारला होता का? सरकारनी लग्न लावायचे, तर सरकार लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. फडणवींसाच्या या टिपणीवर सभागृहात एकच हशा पिकला.
लगेच आदित्य ठाकरे नको, नको म्हणत म्हणाले की, ही काय राजकीय धमकी आहे का? लग्न लावून देऊ नाहीतर तुम्ही आमच्यासोबत बसा. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, आधी लग्न कोंढाण्याचे.
(हेही वाचा – संजय राऊत महागद्दार, हिंमत असेल तर राजीनामा द्यावा; मंत्री शंभूराज देसाईंचा विधानसभेत घणाघात)
Join Our WhatsApp Community