Gudipadwa 2023 : राज्यभरात शोभायात्रांचे आयोजन, गुढीपाडव्याचा उत्साह! पहा क्षणचित्रे

256

महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : मानव-वन्यप्राणी संघर्ष : केंद्र सरकारने जारी केली १४ मार्गदर्शक तत्वे )

मुंबईच्या गिरगावमध्ये २२ फुटांची गुढी

मुंबईतील गिरगावमध्ये दरवर्षी शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गिरगावला जातात. गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरूवात झाली असून याठिकाणी २२ फुटांची गुढी उभारण्यात आली आहे.

New Project 5 4

मुंबईसह पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळत आहे. या शोभायात्रांमध्ये अनेक सेलिब्रिटींसह राजकीय नेते सुद्धा सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.

New Project 7 4

नागपूरच्या तात्या टोपे नगर गणेश मंदिरातून शोभायात्रेच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.

New Project 3 5

पुण्यात बावधनमध्ये हिंदू नववर्ष स्वागत समिती यांच्याकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुले भगवान राम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभुषेत तयार झाली आहेत.

New Project 6 4

संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये मिरवणूक, शोभायात्रा, बाइक रॅली काढण्यात आल्या.

New Project 8 2

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.