ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवार दिनांक २४ मार्च २०२३ दुपारी १२.०० वाजता ते शनिवार दिनांक २५ मार्च २०२३ दुपारी १२.०० वा पर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
( हेही वाचा : देशातील टॉप टेन खासदारांच्या यादीत महाराष्ट्र अग्रेसर! सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेसह आणखी दोघांचा समावेश; नंबर वन कोण? )
१ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा
सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, मुंब्रा प्रभाग समिती मधील वाय जंक्शन ते मुंब्रा फायर ब्रिगेड परिसरापर्यंत व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community