दोन विमानांची होणार होती धडक, तेवढ्यात…जाणून घ्या संपूर्ण घटना

168

नेपाळ एअर लाईन्स आणि एअर इंडियाचे विमान एकमेकांच्या जवळ येऊन होणारी धडक सुदैवाने टळली आहे. शेवटच्या नियंत्रण कक्षाने वैमानिकांना सतर्क केल्यामुळे हा अपघात टाळण्यात यश आले. दरम्यान या घटनेनंतर नेपाळच्या हवाई वाहतूक विभागातील तीन कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारीचा ठपका ठेऊन त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

( हेही वाचा : उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, पाटणकरांची चौकशी होऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिला; शिवसेनेच्या आमदाराचे खळबळजनक आरोप)

अन्यथा झाली असती मोठी दुर्घटना 

यासंदर्भात सीएएएनचे प्रवक्ते जगन्नाथ निरौला यांनी सांगितले की, मलेशियाहून येणारे नेपाळ एअर लाइन्सचे विमान आणि आणि दिल्लीहून येणारे एअर इंडियाचे विमान एकमेकांच्या जवळ आल्याने टक्कर होण्याची भीती निर्माण झाली होती. नेपाळमध्ये एअर इंडिया आणि नेपाळ एअर लाइन्सची विमाने शुक्रवारी २४ मार्च रोजी एकमेकांजवळ आली होती. परंतु, नियंत्रण कक्षाने वैमानिकांना सतर्क केल्यामुळे संभाव्य अपघात टळला. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

नियंत्रण कक्षाने केले सतर्क 

निरौला यांनी सांगितले की, एअर इंडियाचे विमान १९ हजार फुटांवरून खाली येत होते. तर नेपाळ एअरलाइन्सचे विमान त्याच ठिकाणी १५ हजार फुटांवर होते. रडारवर हे दिसल्यानंतर नेपाळ एअरलाइन्सचे विमान ७ हजार फूट आणखी खाली आले आणि मोठा अपघात टळला. या घटनेनंतर हवाई वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणी तपास करण्यासाठी ३ सदस्यीय तपास समितीची स्थापना केली आहे. सीएएएनने या घटनेच्या वेळी कंट्रोल रूमचे प्रभारी असलेल्या ३ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.