मविआची सभा होऊ नये म्हणून हिंसाचार घडवून आणला; राऊतांचा गंभीर आरोप

145

महाविकास आघाडीची २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे ही सभा होऊन नये म्हणून संभाजीनगरमध्ये हिंसाचार घडवून आणला, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला.

नक्की काय म्हणाले संजय राऊत?

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, संभाजीनगरला २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे. ती सभा होऊ नये किंवा कायदा, सुव्यवस्थेच्या कारणाखाली ती सभा होऊ नये, त्या सभेला परवानगी मिळू नये. कायदा, सुव्यवस्थेचे कारण द्यायचे, तणावपूर्ण वातावरण आहे, भडका उडू शकतो, हे कारण पुढे करून सभेला परवानगी नाकारायची. सभा होऊन द्यायची नाही, हे कारस्थान आहे.

पुढे राऊत म्हणाले की, आमचे सरकार जेव्हा होते तेव्हा दंगली झाल्या नाहीत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना तेव्हा दोन वेळा रामनवमी झाली. तेव्हा दंगली झाल्या नाहीत. गुजरातमध्ये भाजप सरकार आहे, महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आहे. तुमच्याच राज्यात दंगली का होतात? कारण तुम्ही दंगलीसाठी लोकांना स्पॉन्सर्ड करतात, असे म्हणते राऊतांनी भाजपवर निशाणार साधला.

(हेही वाचा – मालवणी राडा प्रकरणी २० जणांना अटक; नक्की काय घडले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.