Goal in Saree; साडी नेसून मेस्सी आणि रोनॅल्डोप्रमाणे फुटबॉल खेळतात ‘या’ महिला

मध्य प्रदेशात महिला साडी नेसून, स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळताना दिसत आहेत, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल.

127

नारी सब पर भारी असे म्हणतात ते उगाच नव्हे. आपण ज्याची कल्पना करु शकत नाही, असा पराक्रम स्त्री करु शकते. मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे आयोजित एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेत महिलांनी जे करुन दाखवलंय, त्यास तोड नाही.

मध्य प्रदेशातील ग्वालियरमधल्या एका वेगळ्या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला साडी नेसून, स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळताना दिसत आहेत. खरंतर साडी नेसून महिला अनेक कामे अस्खलित करतात. मग बस ट्रेनमधून किंवा स्कुटीवरुन प्रवास असो, घरची सगळी कामे असो आणि त्याचबरोबर कार्यालयाची धुरा सांभाळणे असो, महिला ह्यात तरबेज असतात.

ग्वालियर येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचं नाव होतं ’साडी में गोल’. २५ ते ५० वर्षांमधील महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला.  विशेष म्हणजे काही महिलांनी तर महाराष्ट्रीय पद्धतीची साडी नेसली आहे आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात मराठी कुटुंब राहतात.

(हेही वाचा देशी टॅलेंट: या तरुणाने बनवली अशी बाईक ज्यासाठी इंधनाची नाही गरज)

साडी में गोल चा व्हिडिओ इथे पाहा:

त्यामुळे आजही काही कुटुंब आपली मराठी परंपरा सांभाळत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सर्वांचं याकडे वेधलं गेलं आणि प्रत्येक वापरकर्त्याने या महिलांची स्तुती केली. विशेष म्हणजे अगदी व्यावसायिक फुटबॉलपटूप्रमाणे या महिला फुटबॉल खेळताना दिसल्या. आपली संस्कृती आणि खेळ यांचा असाही मिलाफ होऊ शकतो, हे पाहणं खरंच औत्स्युक्याचं ठरत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.