धक्कादायक! पुण्यात जन्मदात्या आईनेच केली ४ वर्षांच्या मुलीची हत्या

150

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गाड्या पेटवणे, कोयता गॅंगनंतर आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या चार वर्षांच्या मुलीची चाकू भोसकून हत्या केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

( हेही वाचा : नामिबियातून भारतात आलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू!)

ही घटना सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकूर सोसायटी ससाणे नगर येथे घडली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. वैष्णवी महेश वाडेर (वय-४) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून या प्रकरणी तिची आई कल्पी हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात केले आहे. या आईने आपल्या मुलीची का हत्या केली यामागील कारण सध्या अस्पष्ट आहे.

आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत गेल्या काही दिवसांपासून एकटीच राहत होती. काही महिन्यांपूर्वीच ही महिला या परिसराक राहण्यास आली होती. बेकरी प्रॉडक्ट विक्रिचा व्यवसाय ही महिला करत होती. सोमवारी भाड्याचे घर ही महिला खाली करणार असल्याने घरमालक तेथे गेले तेव्हा या महिलेने आतून दरवाजा बंद करून घेतला होता. शेजारच्या महिलेने दरवाजा उघडण्यास सांगितले मात्र आरोपी महिलेने दरवाजा उघडला नाही. शेवटी घरमालक व शेजारी आत शिरले तर त्यांना मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली व आरोपी महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. अशी प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.