ऑस्ट्रेलियातील कॅनबरामध्ये अचानक लाखो मासे मृत पावले. ही घटना धक्कादायक होती. मेनिंडा शहरातील नागरिकांनी मेलेल्या माश्यांमधून घाणेरडा वास येत असल्याची तक्रार केली होती. ऑस्ट्रेलियाच्या एका नदीत अनेक माश्यांचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच हाहाकार माजला.
मेलेले आणि सडलेले मासे पाहून नेटकरी भडकले. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डार्लिंग नदीमध्ये घडली असल्याचे समोर आले आहे. वाईट गोष्ट अशी की मेलेल्या माश्यांमुळे सबंध नदी सफेद रंगाची दिसत आहे. न्यू साऊथ वेल्सच्या प्रशासनाने म्हटले आहे की मेनिंडा शहरातील नदीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.
यामागे कारण काय असेल याचा शोध घेताना समजलं की ऑक्सिजनच्या अभावामुळे ही घटना घडली आहे. अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी म्हटलं की उष्ण हवामानामुळे या माश्यांचा मृत्यू झाला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या प्राथमिक उद्योग विभागाने देखील हेच कारण सांगितले असून माश्यांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र शहरातील पूर आणि उष्ण वातावरणामुळे ही दुःखद घटना घडली आहे.
दुर्दैव असे की २०१८ पासून या क्षेत्रात घडलेली ही ३ री घटना आहे. म्हणजे विचार करा इथे किती लाख माश्यांचा मृत्यू झाला असेल. स्थानिक नागरिक म्हणतात की तुमची नजर जाईल तितक्या दूरपर्यंत मेलेले मासे दिसून येतात. यामुळे हेरिंग आणि कार्प माश्यांची संख्या घटत चालली आहे. यावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा जळगावमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या पालखीवर मुसलमानांकडून दगडफेक )
Join Our WhatsApp Community